Skip to main content

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध
रेलून पडल्या आहेत कथा कविता माझ्या
त्यावरील तिळावर लिहला आहे सस्पेन्स मोठा
काखेतल्या अस्थाव्यस्थ दशेवर खुश असलेली पटकथा
खुलून दिसेल सारं जग नैतिकतेच्या कचाकडी दुनियेत
सौंदर्य पण कसं सापेक्ष असतंय
तू दिलेल्या जखडून ठेवलेल्या आठवणी
अजून हातात तश्याच निस्तेज पण प्रखर धावतात
रक्त जसं प्रवाही होतंय तसं सगळं अजून होतंय काटा
नको असताना टोचणाऱ्या फिलिंग्स कश्या आल्हाददायी
उठून दिसेल हे सारं दुखणं जेव्हा ओलावा कप्पर होईल सकाळी
बघ प्रेम कसं निरपेक्ष असतंय
असण्या नसण्याने नसलेली तू जेव्हा नसताना येतेयस
तेव्हा मी पण असलो नसलेलो जेव्हा असतोय तुझ्यात
तुझ्यातून मग मी गो थ्रू होऊन आडवा इनफ्रंट होत जातोय
हे सगळं लिहून येतंय हळुवार जश्या रेघोट्या ओल्या
बघ असं ओलावा असतो हे सारं असं आलबेल असतंय..

बाकीआलबेल
अजिंक्य रोकडे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणसाने गझल ऐकली पाहिजे 🌼

माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित  पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने  मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे  डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे  पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता  बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे  कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर  तशी सल राहावी मनाच्या पटलावर  आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा  निर्विकार आठवला पाहिजेल  विश्वाचा...

गुडूप व्हावं लागतं...😌

वारसा व्हायला  आधी गुडूप व्हायला लागतं उदरात आज गेलेलं  खोदतील तेव्हा  रक्त मिळेल  का कार्बनच जास्त मिळेल उकरून उकरून  अस काय उकरतो आपण भूतकाळ  इतिहास  मढी काय निकष असतील तरी किती सापळ्यांचा ढीग लागतो स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात का मदरबोर्ड पण चालतील  संस्कृती आणि खाद्य  पेटित ठेवलेल  रेशनकार्ड पाहून समजतील डब्यात तांदूळ करंड्यात कुंकू देवळात देव सगळं इथेच असेल निकष असे काय आहेत जागतिक व्हायचे   व्यापारावर चलनावर  देवावर मूर्तीवर चित्रावर  की फक्त गुडूप होण्यावर की वारसा व्हायला  आधी गुडूपच व्हायला लागतं अजिंक्य रोकडे.....

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...