Skip to main content

बाकी आलबेल अर्थहीन आहे 😵‍💫


कविता करूया का विचाराने
कविता होतेय
अनामिक लागलेली आर्थिक भीक
कवितेच्या आड येतेय
विचार आणि प्रगल्भता उसने आलेले विचार
असामान्य असलेले विचार असामान्य असलेले आचार
आणि ह्यात काहीच साम्य नसलेलं आयुष्य
ह्या सगळ्या कोलाहालात झालेला कवी लाचार
कविता उरात आहे सत्यात नाही
सत्यातून खोट्यात पण नाही
येत नाहीय जोर लावून
वाटतंय करावी भावना आहे खवून
शब्द यमक होईल पण करतो उसवून
उगच शिवी नको बघुया फसवून
साला आता मनं सांभाळू वाटतात
पत्रे उडाले म्हणतात नां लागले
कि कविता सोज्वळ करतोय
असल्या हजारो विचारांचं मंथन करतोय
कोण म्हणतंय कवितेला अर्थ हवा
कोण म्हणतंय त्याला यमक हवं
आपल्याला पटलेलं रुचलेलं सुचलेलं
अर्थहीन काही का असेना अर्थहीनच गमक हवं
बाकी आलबेल कविता करत जातो
बाकी आलबेल गृहीत धरत जातो
बाकी आलबेल अर्थहीन आहे
मर्म शोधू नका
त्याच्या शब्दात अर्थ शोधू नका


#बाकी आलबेल
अजिंक्य रोकडे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

किर्रर्र 🍃

   लाकडी आरामाखुर्चीवर जेव्हा रघु बसला तेव्हा 'किर्रर्र' असा आवाज आला, विचारांची साखळी काही वेळा साठी स्तब्ध झाली आणि पुन्हा स्वतःला कमफॉर्टेबल करून घेतल्यास ती साखळी नव्या विचारांना वाट करून देऊ लागली... रघु नुकताच कामावरून आलेला, समाधानी वाटाव इतकं समाधान तर होतच त्याचाकडे पण मन सैरावैरा, कानात वारा गेलेल्या वासारा सारखं वेडंवाकडं पळत होतं, ह्याच कारण अचानक गार वारं सुटलेलं, हवेत गारवा आलेला आणि त्यासोबत पालापाचोळा उडत खिडक्यानमधून आतमध्ये येत होता, एरवी तो कचराच जणू पण आज ते काहीतरी भासवत होतं, रघुने जेव्हा पहिल्यांदा गाडी घेतलेली तेव्हा लीलासोबत रघु बाईकने फिरायला गेलेला, चहाच्या टपरीवर थांबले असताना असंच काहीसं वातावरण तयार झालेलं, तिचे केस तेव्हा हवेत एक फ्रेम बनवून आकाशासोबत एक सुंदर कलाकृती बनवू पाहत होते, चहाच्या वाफा तिच्या चसम्यावर येऊ पाहत होत्या आणि ती चष्मा व्यवस्थित करू पाहत होती, ओढणी सांभाळत होती अशी तिची अल्लड गडबड झालेली, रघुच्या मनात एक सुंदर आठवन, आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींच्या यादीत त्यांनी ठेवलेली ती आठवण आज मनात ह्या वातावरणाने रेंगा...

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...

आणि जिंकलो 🤍

चौदा वर्षाचा मुलाने सिक्सर शतक मारणं  आपण चषक जिंकणं  आपण किती रन्स झाले  किती ऑऊट झाले  किती गेले आणि किती बदला घेतला  आणि जिंकलो  आपण किती इनिमी किल्ल केले  आपण किती चिकन डिनर केले  आपण किती गोल्ड डायमंड प्लॅटिनम झालो  आणि जिंकलो  आपण किती कुणाची मारली  कुणासोबत कुणाची किती जिरवली  कुणाला किती लायकी दाखवली  आणि जिंकलो  आपण किती पैसा कमावला  आपण किती भारी नोकरी केली  किती सुंदर बायको केली  कसा संसार केला  आणि जिंकलो  आपण किती सर्विस केली  किती अनुभव आहे  किती पैसे उकळले  किती कुणासाठी काय केलं  आणि जिंकलो  आपण किती माज केला  आपण किती उन्माद केला  आपण कुणालाच भिलो नाय  मी अजिबात घाबरत नाय  आणि जिंकलो  इतकं सोपं सोपं हे सगळं नाय लिहलेलं समजेल इतकं पण सोपं नाय  कोण मला काय बोलेल इतकं पण सोपं नाय  कुणाच्या भावना दुखावतील इतकं पण सोपं नाय  दुखावल्या तरी काय बोलू शकत नाय  लिहीत इतकं पण सोपं नाय  बाकिआलबेल