Skip to main content

प्ल्यूटो🌼


murphy's law तसा घाणेरडा प्रकार, वैज्ञानिकदृष्ट्या तो काही सिद्ध वगरे झालेला नाहीय पण तो काम करतो खतरनाक, तसं काही गोष्टी सिद्ध व्हाव्याच लागतात असं देखील काही नाही, काही गोष्टी दाबून ठेवाव्या लागतात अंतरमनात, असे जड शब्द लेख तरी भारी बनवतात नशीब कोवळ्या वयात काही पुस्तकं अशी वाचून ठेवली आहेत, त्या शिवाय भूमिकेला भक्कमपणा येत नाही, लोकांना आपण दूरचे वाटू लागतो जेव्हा सगळं तरल दिसू लागतं मग कोणत्या अपेक्षित गोष्टी न का होईना सगळं ठीकच आहे हा अट्टाहास हवा वाटतो, ह्या साऱ्या कोलाहलात आपण आपले विचार आपल्यासोबत होणाऱ्या घटना सगळ्या चिंधी म्हणून जग पाहत असेल तेव्हाच आपण घडत असलेल्या पेक्षा वाईट चिंतून बुध्दासारखे हसत असतो किंवा हळहळत असतो, एकादी गोष्ट वाईट होतच गेली तर ती वाईटच होते असं काही ऐकून पाहून वाचून अजून वाईट होण्याची शाश्वती मिळते त्यावेळेला मोटिवेशन म्हणून राशीभविष्य वाचताना लाभ होईल वाचून अजून हळहळ होते, लाभ होतात ते कोणत्या बाबतीत किती बाबतीत आणि कोणत्या परिप्रेक्षात, कोण काही सहज बोलून जातंय तेव्हा त्याचे शब्द, वागणं लाभामध्ये धरून ठेवायचे असतात का? दिवस चांगल्या घटना अपेक्षित करत असताना आपण हसूच कायम ठेवलं आहे नाही का? सिरीज मुव्ही बऱ्या वाटतात, एका ठिकाणी ऐकलं काही जाम आवडलं, प्ल्यूटो आधी ग्रह होता पण काही दिवसांनी त्याने सूर्याची परिक्रमा करायची कक्षा बदलली, मग कोणत्या तरी रूममध्ये बसून कुणीतरी ठरवलं कि आता प्ल्यूटो ग्रह नाही,प्ल्यूटोला काही फरक पडला नाही प्ल्यूटो अजून आहे आणि त्याला फरक पडत नाही दूर कोसावर बसून त्याला मान्यता देणाऱ्या आकाशगंगेत बसलेल्या लोकांना काय वाटतं कि तो ग्रह आहे कि नाही, म्हणून प्ल्यूटो बनलं पाहिजे, बहुतेक प्ल्यूटोने murphys law फाट्यावर मारला तो विहार करत बसला असेल, जर ग्रह आपल्या जीवनात काही फरक पाडत असतीलच तर प्ल्यूटोची पूजा केलेली कधी पण चांगली, देवच जणु ✨

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....