अशी मुद्रा बनव...🤡
अशी मुद्रा बनव की त्या मुद्रेत तुझ्या शरीराला आराम मिळेल , मनाची बेचैनी स्थैर्य गाठेल , शक्य असेल तर डोळे मिटून घे काही क्षण , शरीर थकलं आहे म्हणून झोपणं सोडून दे , डोळे बंद होत आलेत म्हणुन झोपणं सोडून दे , झोप एकदा स्वतःसाठी निवांत , शांत आणि मर्जीने स्वतःच्या इंद्रियांना तुझी वाहवा करण्याची संधी दे …..
एकांताचा शोधात अजून नवीन ओळखी होतील तेव्हा अजून तळमळ वाटेल एकांतात राहण्याची , तेव्हा मुद्दाम लोक येतील तुझे हाल किंवा जास्तीत जास्त खुशाली विचारण्यास तेव्हा मात्र हसून उत्तर दे , वाटेल नवीन जग वसाववं , तुझे नियम , तुझ्या अटी आणि तुझ्या योजना राबवाव्यात पण निरस होईल जगाचे नियम समजवून घेताना , तेव्हा जाणीव होईल तू ही हिस्सा आहेस ह्या साऱ्याचा , सृष्टीच्या गाड्याचा , जगाच्या गुपिताचा , पुस्तकातील पात्रांचा , आरश्यातील स्वतःच्या प्रतिबिंबाचा , कुणी तुला वेगळा म्हणाला तर तुझी खेचत आहे समज , शहाना हो आणि जमिनीवर रहा , शेवटी काय तीच माणसं , तेच कुटुंब , तोच स्वभाव आणि तेच जग….
खूपच छान
ReplyDeleteसुंदर..
ReplyDeleteवाह ! खुप सुंदर
ReplyDeleteस्वत्वाचा अविष्कार खूप भावला👌👍
ReplyDeleteसगळ्यांचे आभार...💐
ReplyDelete