लिहून काढता काढता वेळ काढता यावं , अश्या काळात आलेले आपण, महत्वाचं काय आणि मूल्य कितीचा खटाटोप सारा, गिग वर्कर्सना किती आराम मिळत असेल आणि सुट्टी आपली सुट्टी त्रासदायक, संवाद कमी मानवी संवादात गैरसमजाची भीती माणसाला माणसापासून दूर ढकलत असताना, नाईलाजाने दोन शब्द बोलावे आणि रात्री छप्पराने आपला पश्चाताप आर्त होऊन पहावा.. पैसे जात येत असताना पण साठा पैशाचा किती त्यावर ठरणारे मान अपमान फाडत नेतात नैतिकतेचा सदरा कचाकच, आनंदी आणि समाधानी माणसाची कबर मलकटलेली लादी प्लास्टरचीच का असते ह्याची उत्तरं शोधावी आणि पुन्हा प्रात्यक्षिक जीवनात पायउतार व्हायला सकाळ तयार असते नव्या उमेदीने, लक्ष्य हवं माणसाला, माणसाने आवाजवी स्वप्न बघून त्याचा प्रयत्नात पार डुंबून जावं आणि गंभीर, मानसिक दुःखाचे मैथुन करून घ्यावं, लय आनंदी राहण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करणारे दांभिकतेचि आठवण करून देतात, मनमोकळे असावे संवाद ही अपेक्षा म्हणून ठीक आहे, उरली आहे..
माणसांला जर तर आहेच, शक्यता आहेत, अनेक वळणं आहेत मग सगळं नीटच असावं नेटकं, हा अट्टाहास वाटतो, चूक झाली आणि पुन्हा पुन्हा करता यावी आणि मग उभार घ्यावा आणि परत चूक करावी, ठोकताळे तर आहेत, काढता याव्या चुका आपल्या आपल्यालाच , झालेलं घडलेलं आणि तत्सथ बनवून सगळं करता यावं लिहता, वाचता,बोलता,चालता आणि बरंच अवघं...
Comments
Post a Comment