Skip to main content

वस्तूंचा मोह सुटावा 🫴🌱

संघर्ष कुणाला नाही चुकला म्हणा, हे असं उदास आणि निराश वाटणं साहजिकच असतंय, मी बरेच जणांना पाहिलं आहे आव आणताना कि पहा किती पॉसिटीव्ह वगरे आहे पण सुखी तो असतो किंवा दिसतो, जो व्यक्त होत नाही.... मी नेहमी पाहत असतो पेजेस फेसबुक वर ज्यावर वेगळी वेगळी पेंटिंग्स वगरे असतात vincent van gogh सोबत ओळख झाली रमायला होतं त्याचा चित्रात, व्हिन्सेंट व्हॅन गॉग हा खरंच सध्या माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक झाला आहे, मी आता आता त्याचासोबत कनेक्ट होऊ लागलो, त्याची दुनिया रंजक आहे, जादुई आहे जे जे आपल्याला प्रश्न भेडसावत असतात त्यांना तो उत्तर आहे.... नैराश्य, चिंता आणि हजारो लफडी आणि स्वतःबद्दलची कीव आपण ज्या ज्या सोबत झुंजत आलो, भांडत आलो, निस्तरत आलो पण हे काही रडल्यागत नाही सांगत कॉमन आहे आणि सगळ्यांना मान्यच असतं थोड्याअधिक प्रमाणात ते आपलं 🫴 so called दुःख, पण काहीतरी सकारात्मक नसेल निष्कर्ष तर त्या कलेला आणि कलेच्या माऱ्याला काय अर्थ......  व्हॅन गॉगप्रमाणेच, मलाही नेहमीच रात्रीच आकर्षण राहिलं आहे. त्याच्यासाठी रात्र प्यारी होती आणि दिवसभराच्या कामानंतर त्याचा त्याचा एक स्पेस होता आणि ती त्याची मोकळीक आणि व्यक्त होणं आपल्यात आहे हे जाणवतंय . Simile (रूपक अलंकार) शिकवताना नेहमी तो आठवतो पण असली उदाहरणं एकतर आपल्याला वेड्यात ठरवतील नाहीतर त्या विचित्र नावाचा जोक होईल म्हणून टाळलेलीच बरी नाही का?? 
व्हॅन गॉगला रात्र फार आवडायची, मला असं वाटतं कि त्यात एक थैराव असतो सगळ्याच बाबतीत, सुख असतं, दुःख असतं, वेगवेगळ्या भावना असतात मुळात वेदना असतात ज्यांचा खरंच कधी गंभीर अपघात वगरे झाला असेल त्यांना वेदना माहित असतील मानसिक काय झेलता येतात पण शारीरिक बेकारच जागेवर बसवतात हे असं म्हणणं माझं अतिशयोक्ती ठरेल पण जसा हा कलाकार तसा एक फैज म्हणतो तसं 'और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा 
राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा' आता तुम्ही ह्याचे अर्थ काढत बसा जसा मी त्याचा चित्रात शोधतो, शोधला असेन किंवा अजून फार वेळ आहे विचार करायला. चित्रातील तारे फिरत आहेत आणि त्याच्या चौकटीत फिरत आहेत अस दिसत . Starry nights नावाची कलाकृती, नाव पण का असं त्यात stare करण्यासारखं काय आहे, हे ज्याचा त्याचा विचारावर डिपेंड करतं आपण काय कोण ह्यातला अभ्यासक वगरे नाही पण काहीतरी खरंच त्यात stare करण्यासारखं आहे, त्याची कलाकृती मेल्यावर प्रसिद्ध झाल्या म्हणे तो बोलून गेलेला  "मला अनंतात एका फिकट ताऱ्याची चमक दिसली" एका विचाराला इतकी बोली लागू शकते, एक ज्याला काही ध चा मा माहित नसताना टाईप करू लागला.....शुक्रवार बाजारात कष्टकरी कामगार भाजी न्यायला एक पिशवी काय घेऊन येतो, आताच कुठे सांज अंधार करू लागलेली आणि त्यावर एक चित्र "starry nights" त्याचा घामाचा दर्प आणि केलेली मेहनत पाहून नाही विचारू वाटलं पिशवी कुठून घेतली, विचारला तो दर "कशी घेतलीत वांगी", मोह सुटत नाही, पिशवी मागू वाटली पण कधीतरी काहीस मीच लिहलेलं 'वस्तूंचा मोह सुटला पाहिजे'  म्हणून जडच अंतकरणाने जड शब्द लिहू नंतर, म्हणून माघार घेतली आणि हा लिहायचा अट्टाहास.... आणि लिहून असं बरेच दिवसांनी व्यक्त झाल्यावर वाटलं..... अनंत जन्मीचे विसरलो दुःख..... 

#बाकीआलबेल
अजिंक्य रोकडे (देवा)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

उभे असू जिथे, तिथे नवीन परीक्षा द्यायला🖤💫

           एक मोकळं माळरान आहे आणि मध्ये एकटंच झाड उभं आहे, पाठीमागे सूर्य मावळतोय, मस्त छटा दिसत आहेत, काही ढग काळे आहेत, काहींना सोनेरी कडा आहे. खाली जमीन तांबडी, तडे गेलेली. वाळलेल्या काड्या, जमवली तर फाटी जमतील गोयलाभर . सगळं शांत. पण त्या शांततेत एक कोलाहल पण जाणवतो आजकाल.... हुबेहूब वाटावं असं वातावरण.... आपण जन्माला येतो तेव्हाच पहिली परीक्षा सुरू होत असते, रडलास का नाही? श्वास घेतलास का नाही? वजन किती? पहिल्या दिवसापासून आपल्याला मोजलं जातं, तोललं जातं. मग शाळा सुरू होते. पाटी-पेन्सिल, दप्तराचं ओझं, आणि मार्कांचं टेन्शन. दहावी म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. बारावी म्हणजे करिअरचा पाया. CET, नोकरीसाठी इंटरव्ह्यू, पैसे, व्यापार....पेपर संपतच नाहीत, आयुष्याचा पेपर कधी पुढे पुढे सरकत जातो समजतच नाही...    पण खरं सांगू? हे सगळे पेपर सोपे होते. कारण त्यात प्रश्न छापलेले असायचे. चार पर्याय असायचे. वेळ ठरलेली असायची. पास-नापासचा निकाल ठरलेला असायचा. पण इतर बितर चे प्रश्न आपण दूर लोटत जातो आणि खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा उत्तरप...

अनामिक🌼

     त्यादिवशी नाक्यात गेलेलो , फॉर्म भरला , ५००० जागा आणि एक माझी पोस्ट ह्या आशेवर , ओबीसीला ह्यावेळी जोराच माप मिळालं म्हणावं , सकाळपासून आहे इथेच भूक अनावर होत होती , वडापाव खात होतो पण कोणीतरी ओळखीचं आजू बाजूने जातच असत पण काही वेळा वेगळे भास होतात , तस पण सगळे हवं हवं असणार दृश्य शोधत असतात , मी कॉलेज वरून , कामावरून येणाऱ्या , मुली ,  स्त्रिया दिसतात का पाहायला नजर इकडे तिकडे केली , हो म्हणूनच , एक मुलगी जणू एवढ्या पावसात पण पाय घाण न होता चालत होती  , माझी नजर तिच्या पायांवर गेली , पैंजण होतं , पदवी शिक्षण झालं असेल , माझ्या वयाची आहे , पाय गोरे आहेत , सुंदर असणार , इतक्या अलगद कश्या चालू शकतात ह्या मुली , मला तर पाय साफ ठेऊन गाडी पण चालवता येत नाही , जन्मतः मुली अश्याच असतात का , किती काळजी घेतात स्वतःची , मी वर पाहिलं तर आखीव रेखीव शरीर , चेहरा गोलच , हो गोलच होता , एकंदरीत केस पण छान होती , मला छोटी केस आवडत नाहीत आणि आवडली तर पूर्ण बोबकट असावा , डोळे तिच्यावर स्थिर केले आणि तिने पण माझ्याकडे पाहिलं , मी चावा घेतला वड्यावर आणि नेमकं तेव्हाच हिने मला पह...

माणसाने गझल ऐकली पाहिजे 🌼

माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित  पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने  मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे  डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे  पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता  बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे  कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर  तशी सल राहावी मनाच्या पटलावर  आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा  निर्विकार आठवला पाहिजेल  विश्वाचा...