Posts

बाकी आलबेलने आसमंत केला 🌼

Image
ह्या एकांतीत गजबजलेल्या रस्त्यावर हजारो स्वप्न आपणच आपली तुडवली माझ्या कवितेच्या कवीला शब्द गावल्यावर आनंदी आणि प्रेमाची लाखोली तुडवल्यावर मग त्याने एक चित्र काढलयं राग आणि द्वेषाने भरलेल्या जगात जड मनाने हताश अंतःकरणाने लिहलंय भग्न अवशेष स्वतःचे शोधले आहेत वगात  त्यानी वेश्या लिहल्या येडी लिहली  जुगारी, चोर आणि पळून जाणारी पाहिली  एक दोन दिन मजबूर कहाणी रातोरात पिली आशेचा किरण सतेज पाहून कांती कशी त्याची उजळून निघाली शब्द गोंगाट करत आणि धुरातून कापत निघाले प्रस्थापित असलेल्याना प्रश्न अन्नूलेखाने उत्तरं मारत निघाले पात्रांमधून त्याच्या सगळे कसे न्हावून निघाले त्या पात्रात शोधत त्याचे वाचणारे त्यांने मजूर लिहले आणि असे निरागस लिहले विसरलेल्या सावल्या लिहल्या कवितेत आवाज लिहला रूढी वगरे साऱ्या तडीपार नेल्या कधी नव्हे त्या क्रांत्या तडीपार केल्या कोपऱ्यातल्या अंधारात वाती नेल्या बाकी आलबेलने रस्त्यावरचा कविता आसमंत केल्या.. अजिंक्य रोकडे बाकी आलबेल

मी त्याचा सारखा लिहितोय 💛

Image
मी त्याच्या सारख लिहितोय  आलबेल बिंदास होतोय  नाक्यावरचा कवी झालोय  कधी किरकिर कधी काव्यात वाहतोय  मी आयुष्यात गंडलोय जसं मद्यधुंद कवीच नृत्य बनतोय  हजारो संधीचा लाभ एक झालोय  अंधार स्वीकारत हास्य फेक होतोय  माझे शब्द कच्चे म्हणे ग्रामर गंडलय यमक हरलंय आमचं आयुष्य सरलंय भ्रमनिरास झालेल्या जगाचे वाभाडे मोजतोय मी पितोय सोबत शब्दांचा जुगार खेळतोय क्षणभंगुर आनंद शोधतोय अर्थाच्या चेतनेचा पाठलाग करतोय माझी कविता समजावी म्हणून त्या सत्याची चावी  शोधतोय माझे शब्द निषेध केलेत ते नॉर्मल करतोय अनुरूप असं काही नाही त्या अनुरूपतेच्या विरूद्ध बंड करतोय समाजाच्या रूढी आणि समज त्या मधील अंतर मोजतोय मी बहिष्कृत, चुकीचे आणि हरवलेल्यांना आलिंगण देतोय ज्यांनी आयुष्याला आवाहन दिलंय त्यांना आवाज देतोय मी प्रेमाबद्दल लिहितोय सुंदर जे आहे ते हवंय आणि दुःखद जे आहे ते पण शोधतोय हिरमुसली हृदये आणि राख झालेली स्वप्ने सावडतोय आणि प्रेमाकडे वळतोय मी सांसारिक देखाव्याकडे सुंदरतेच्या नजरेने क्वचित पाहतोय  गलिच्छ बारमध्ये स्वतःला शोधतोय एकांतीत खोलीत हजार पुस्तकं होतोय मी बिंदास होतोय किमान आलबेल होतोय किं

तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध 🌼

Image
तुझ्या दोन्ही त्या उरोजांनच्या मधोमध रेलून पडल्या आहेत कथा कविता माझ्या त्यावरील तिळावर लिहला आहे सस्पेन्स मोठा काखेतल्या अस्थाव्यस्थ दशेवर खुश असलेली पटकथा खुलून दिसेल सारं जग नैतिकतेच्या कचाकडी दुनियेत सौंदर्य पण कसं सापेक्ष असतंय तू दिलेल्या जखडून ठेवलेल्या आठवणी अजून हातात तश्याच निस्तेज पण प्रखर धावतात रक्त जसं प्रवाही होतंय तसं सगळं अजून होतंय काटा नको असताना टोचणाऱ्या फिलिंग्स कश्या आल्हाददायी उठून दिसेल हे सारं दुखणं जेव्हा ओलावा कप्पर होईल सकाळी बघ प्रेम कसं निरपेक्ष असतंय असण्या नसण्याने नसलेली तू जेव्हा नसताना येतेयस तेव्हा मी पण असलो नसलेलो जेव्हा असतोय तुझ्यात तुझ्यातून मग मी गो थ्रू होऊन आडवा इनफ्रंट होत जातोय हे सगळं लिहून येतंय हळुवार जश्या रेघोट्या ओल्या बघ असं ओलावा असतो हे सारं असं आलबेल असतंय.. बाकीआलबेल अजिंक्य रोकडे

आपण गिनतीतच न्हवतो 🌼

Image
हिशेब मांडायचास पोरांना दाखवायसास पावत्या गंडत #डीत गेले हिशोब आता गिनतीत नाहीस गिनती विसरलास आपण न्हवतो प्रेमात न्हवतो नात्यात न्हवतो जातीत न्हवतो जातीत असलो तर वयात न्हवतो आपण न्हवतोच आपण कधीच गिनतीत न्हवतो तसे होतो समसमान पर्याय होतो पण कधी योग्य न्हवतो योग्य असलो तरी भ्रष्ट न्हवतो भ्रष्ट असलो तरी प्रामाणिक पण न्हवतो आपण न्हवतो आपण कधीच गिनतीत न्हवतो आपण पन्नास ते साठ होतो कधी नव्वद तर चुकून न्हवतो चुकून नव्वद असलो तर भ्रष्ट होतो आपण मतमतांतरात मत न्हवतो आपण कधी स्पष्ट न्हवतो स्पष्ट असलो तरी मजबूर न्हवतो मजबूर असून गाफिल न्हवतो आपण कधीच गिनतीत न्हवतो आपण खून दरोडे न्हवतो आपण सुजाण वगरे पण न्हवतो पण न्याय सांगतील तो पण न्हवतो आग क्रांती वगरे पण न्हवतो आपण  न्यायनिवाडा न्हवतो आपण न्हवतो आपण गिनतीत पण न्हवतो आपण सुखी कधीकधी न्हवतो आपण दुःखी नेहेमी न्हवतो आपण गंगा आकाश क्वचित न्हवतो सारासार विवेक चुकून न्हवतो गंडत गेलो पण बरोबर न्हवतो आपण न्हवतो आपण कधीच गिनतीत न्हवतो अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

जेव्हा ती म्हणते माझ्यावर एक कविता कर 🌼

Image

प्रवासाला सलाम 🌼

Image
एक माझ्या वयाचा मित्र असला बेफान होऊन मारामारी करायचा, रियल लाईफ मारामाऱ्या कश्या नुसती पकडून धरतात आणि एकामेकाला आवळत बसतात पण हा साला बेडम मारायचा पिक्चर मध्ये बुक्के वगरे मारतात तसा, तसं त्याला भांडण करायच सारासार कारण कधी गावल न्हवत तो त्याचा सगळा राग,द्वेष,गरिबी,नाकर्तेपणा सगळं कोणावर चान्स भेटला कि बाहेर काढायचा त्यात पाचवीला पूजलेलं त्याच दारूचं व्यसन, एक दिवस हे असेच सगळे रस्त्यात बाजूला गपचूप पीत बसलेले मी रस्त्याने गाडी चालवत जात होतो आणि अचानक समोरून एक बाईक आली आणि माझ्या गाडीचा जवळ जवळ येऊ लागली मी खाली उतरलो तरी अजून जवळ आली, पिलेली माणसं म्हणतात गाडी चालवताना लाईट पाहून त्याच दिशेने अजून जोरात जातात आणि अपघात करतात आणि अशी येत येत मला ठोकलं त्याने मी पडलो उठलो बघतो तर त्यालाच लागलेलं मी उचलायला गेलो तर हा आला कि नाही त्याला दे दना दन लाथा बुक्क्या घातल्या ह्यांनी का तर माझ्या मित्राला का ठोकलं,दारू पिऊन! का गाडी चालवतो आणि त्याचा सोबत बसलेले पण मग त्या गाडीवाल्याला मारायला लागले, मी ह्यांना थांबवलं कारण खूप वाईट वाटत होतं आणि ह्यांना शांत केल, ह्या

बडबड

Image
"काय बोलतोयस उनाचा पारा चढलाय काय तरी बडबड तरी मागे एकदा पिल्यावर काय भारी  बडबड केलेलीस हाय तेवढी पण उतरून गेलेली" गण्या "बघ ना अखंड देह रम्या म्हण नाहीतर रमेश इथला नसलाच तर? ज्यांच्यावर मी प्रेम केलं ते केलंच नसेल पण त्या एका तत्वा फित्वावर केलं असेल त्या माणसाच्या कुठेतरी असण्यावर केलं असल, खूप सारे प्रश्न आहेत बघ गण्या, बघ ना मी आहे पण मी नाहीय रे इथे, मला वाटतंय कि मी कशात तरी गुंतलो आहे कोणत्यातरी गोष्टीवर मी प्रेम करत आहे करत राहीन एक न दिसणारा देह असेल आत्मा असेल काहीतरी असेल इथून कुठे तरी दुरवर.... कधी कधी मी उगच रडतो बघ, उगच  फॉर्मात पण येतो पार चेक्काळून जातो,कधी कधी वाटतं खूपच  प्रेम मिळतंय मला आणि असं वाटतं ते जे काही आहे तर आपल्या आतमध्ये देहात ह्या रम्या मध्ये आहे, शोधू कसा गण्या, कुठे  आहे ते?ह्या जगातल तरी आहे का ते? बघ  ना इतकी माणसा आहेत इकडं पण तसं कोणीच  नाही रे आलं आजतगायत...असं वाटतंय ते जे काही आहे ना ते असं जन्मोजन्मीच कोणतरी आहे माझ्या मनातलं खुशपट असल्यागत, असं मन कधी कधी  कावरं होतं तेव्हा बघ वाटतं ते पण मला शोधत असल कुठंतरी! कधी  गाठभेट होईल

वाटाड्या

Image
वाटाड्या वडिलांना रोजच्या प्रमाणे नाक्यात सोडलं आणि पेट्रोल टाकायला पंपावर निघालो तर highway वर एक मुलगा tourist बॅग घेऊन  चालत  होता मी पुढे  निघून  गेलो पुन्हा मागे फिरुन त्याला थंबवलं त्याला त्याचा प्रवासाची माहिती विचारली तर तो म्हणे बेंगलूरू वरून आलो आहे hitch hiking करत संध्याकाळ पर्यंत मुंबईला पोहोचायचं आहे, रत्नागिरी मध्ये एका गॅरेजवाल्याकडे काल वस्तीला होता, मी तुझ्या बद्दल काहीतरी लिहीन असं बोललो आणि एक सेल्फी घेतली  गाडीवर बसूनच  नंतर मला वाटलं घरी नेऊया आणि ह्या असा प्रवास करण्याबाबत माहिती घेऊ किती दिवस झाले आपल्याला पण असंच काहीतरी करायच आहे, घरी  आल्यावर त्याला आमचं कोकणी पद्दतीचा घर बाहेरच आवडलं आणि नकळत त्याने व्हिडिओ चालू केली आणि कानडी  भाषेत घराची  आणि माझी माहिती देऊ लागला आता आपला आणि कॅमेराचा काही संबंध  नसताना डोळे वर खाली करत मी माझी माहिती वगरे सांगितली , घराबद्दल, इथल्या गावांबद्दल, लोकांबद्दल सांगू लागलो माझी सांगितलेली माहिती तो त्याचा भाषेत  रेकॉर्ड करत होता, माझी पुस्तकं दाखवली  आणि मग  चहा पाहुणचार  झाल्यावर मी त्याला सोनगाव कांदळवनात नेतो बाईकने वेळ असे