Posts

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल.. 🌼

Image
प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल तेव्हा तू जाशील दूर रानात तेव्हा तिथे खूप सारी घनदाट झाडी मिळेल पण ओलावा शोधत असताना तुला समजेल माझे विचार किती तरल होते हातात हात घेऊन जेव्हा वाळूवर पाय रोवून तुम्ही जेव्हा प्रेम करत असाल तेव्हा समजेल माझी नजर क्षितिज भेदत होती  कॅफे मध्ये वाफालणारी थंड कॉफ़ी तुम्ही एका स्ट्राव मधून पिऊ लागाल तेव्हा माझी तहान तुझ्या लाळेपेक्षा मोठी होती हे समजेल तुम्ही एकादी निर्जन जागा पहाल आडवे इन्फ्रंट होत जाल तेव्हा समजेल माझ्या मनात बस स्पर्शाच्या भावना होत्या तुम्ही उभे राहाल बोहल्यावर तेव्हा संगीत असं विरश्री मध्ये असेल पण तूला माझी आठवन येईल आणि समजेल मी कसा सुमधुर होतो.. #बाकीआलबेल अजिंक्य रोकडे

बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल 🌼

Image
जगाविषयीची कटुता विसरून आपण प्रेम करत सुटलो पाहिजेल ह्या साऱ्या सणासुदीत आपण तारखा विसरत राहता आलं पाहिजेल मोजलेले पैसे आलेल्यातून वजा झाल्यावर हसू कायम राहीलं पाहिजेल ह्या साऱ्या वेळेत न होणाऱ्या गोष्टी आपण सहन करत ओठांवर हसू कायम ठेवता आलं पाहीजे काहीही असो आनंदी राहिलं पाहिजेल म्हणणारा कसा चुतिया आहे हे त्याने अंतर्मनाला विचारलं पाहिजेल उगा का कोण बुद्धत्वाला जातो असं वागता आलं पाहिजे कि बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल  कालातीत प्रवास करता आला पाहिजेल अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

महत्वाच काहीतरी

Image
यात काहीही शंका नाही कि शिक्षण माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या संविधानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद कलम २१(A) अंतर्गत करण्यात आली आहे. तर अस आहे कि ७०% लोकसंख्या, जर खाजगीकरणा झाले तर हा खर्च उचलू शकणार नाहीत . गरीब व कष्टकरी मूले जर काही प्रमाणात शिक्षण घेत असतील तर मोफत शिक्षणाच्या धोरणामुळे, मूलभूत हक्काच्या मूलभूतपणाचा गाभा प्रतिष्ठा राखणे हा आहे, जर शिक्षणाचे खाजगीकरण झाले तर एक ठराविक वर्गच त्याचा लाभ घेऊ शकतो आणि इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. शिक्षणाकडे जर व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं तर शिक्षण आणि ज्ञान देणे हे मुद्दे दुय्यम होऊन फक्त आर्थिक प्राप्तीकडे कल वाढेल. मागच्या वर्षी १ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली होती तेव्हा मी लेख लिहलेला होता आणि आता देखील 'समूह शाळा' धोरण राबवण्याचा हट्ट प्रशासनाने केला आहे, या धोरणाला सगळीकडून विरोध चालू असताना देखील हा सर्वे व धोरण पुढे रेटले जात आहे. गावपाड्यात शाळा जवळ आहे म्हणून येणारी कितीतरी मुलं आहेत किंवा पोषण आहार मिळतो म्हणून येणारी मुलं आहेत आणि ही

चाफा कधीच कोमेजू नये 🌼

Image
चाफा कधीच कोमेजू नये हा माझा हट्ट खरा त्याचा वास घेत राहायला हात वरती करू नये  छातीपाशी खिशात ठेऊन घेता यावा निरंतर खरं तर केसं पण पिकू नये कुणाची नां कुणाला ययातिची फिलिंग यावी नां कुणी यतीची वाट पाहावी सगळं कसं चालू राहावं कष्टाविना चालू रहावं दुःखाविना  असावं सगळं कसं आलबेल चाफा सुकू नये कधी सुवास कोमेजू नये कधी कधी वाटतं त्यांना तोडू पण नये त्यांना पण जगू द्यावं असंच सुवासिक नाकं न्ह्यावी फुलाजवळ होऊ नं द्यावा मृत्यू देव,माणूस कुणाच्या चरणी नको कुणाचा आवडता नको होऊ द्यावं त्याला चाफ्याची जिंदगी त्यालाच माहित सुंदरतेचे भोग सगळे आवडतीचे रोग सगळे मग म्हणाल चाफा बोलेना चाफा चालेना कसा चालेल कसा बोलेल चुकून विचार येऊ नये चाफा कधीच कोमेजू नये अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

मी मेसेज करत जातो 🤍✨

Image
काल स्वप्नात तिला काल्पनिक hii केला मी, बोललो काहीसं, सांगितलं भूक लागतेय फार आणि खूप सारं खाऊन पुन्हा भूक लागतेय नाही खाल्लं कि विकनेस येतो विचाराने, तू नाय नाय करत तरी माझा विचार करत असशील का तुला भूक लागत असेल का कि जेवण झाला का हा काल्पनिक मेसेज माझा जातोय तुला मग मी गारव्या मध्ये गरम शोधत बुरमूस टोचणारी घेऊन हवं नको असलेलं ऍडजस्ट करत खाज उताणा झोपून तुझ्या भावना चेपत जातोय निरामय आत्म्याच्या भाराखाली हलक्या शरीराने तेव्हा तुला मेसेज जातोय झोपलीस का, तू झोपत अशील का विचाराने झोपेत साप वगरे येतात मी लय घाण घाण स्वप्न बघतोय लोकांना मारतोय, apocalypse पाहतोय पेट्रोल वगरेचा जागतिक पाऊस पडत आहे मी हतबल सगळं पाहून पळत आहे लोकं पळत आहेत मी घाबरून जातोय खुश होतोय लोकांना पळताना आणि अचानक माझा तोल जाऊन पडतोय आणि उठतोय झोपेतून तेव्हा माझी  ऍड्रेणिल रश जो सत्यात नाही तो स्वप्नांत पूर्ण झाला म्हणून उठून घाबरलेला खुश मी, मी घाण स्वप्न असंच पाहत गेलो, गिल्टी झालो, चिवळत बसलो गु घाण, तुला असं झालंय का कधी, असं निरपेक्ष वेडेपणाची स्वप्न तुला अधून मधून पडत असतील का तेव्हा मी मेसेज करतो,

बाकी आलबेल अर्थहीन आहे 😵‍💫

Image
कविता करूया का विचाराने कविता होतेय अनामिक लागलेली आर्थिक भीक कवितेच्या आड येतेय विचार आणि प्रगल्भता उसने आलेले विचार असामान्य असलेले विचार असामान्य असलेले आचार आणि ह्यात काहीच साम्य नसलेलं आयुष्य ह्या सगळ्या कोलाहालात झालेला कवी लाचार कविता उरात आहे सत्यात नाही सत्यातून खोट्यात पण नाही येत नाहीय जोर लावून वाटतंय करावी भावना आहे खवून शब्द यमक होईल पण करतो उसवून उगच शिवी नको बघुया फसवून साला आता मनं सांभाळू वाटतात पत्रे उडाले म्हणतात नां लागले कि कविता सोज्वळ करतोय असल्या हजारो विचारांचं मंथन करतोय कोण म्हणतंय कवितेला अर्थ हवा कोण म्हणतंय त्याला यमक हवं आपल्याला पटलेलं रुचलेलं सुचलेलं अर्थहीन काही का असेना अर्थहीनच गमक हवं बाकी आलबेल कविता करत जातो बाकी आलबेल गृहीत धरत जातो बाकी आलबेल अर्थहीन आहे मर्म शोधू नका त्याच्या शब्दात अर्थ शोधू नका #बाकी आलबेल अजिंक्य रोकडे 

बाकी आलबेलने आसमंत केला 🌼

Image
ह्या एकांतीत गजबजलेल्या रस्त्यावर हजारो स्वप्न आपणच आपली तुडवली माझ्या कवितेच्या कवीला शब्द गावल्यावर आनंदी आणि प्रेमाची लाखोली तुडवल्यावर मग त्याने एक चित्र काढलयं राग आणि द्वेषाने भरलेल्या जगात जड मनाने हताश अंतःकरणाने लिहलंय भग्न अवशेष स्वतःचे शोधले आहेत वगात  त्यानी वेश्या लिहल्या येडी लिहली  जुगारी, चोर आणि पळून जाणारी पाहिली  एक दोन दिन मजबूर कहाणी रातोरात पिली आशेचा किरण सतेज पाहून कांती कशी त्याची उजळून निघाली शब्द गोंगाट करत आणि धुरातून कापत निघाले प्रस्थापित असलेल्याना प्रश्न अन्नूलेखाने उत्तरं मारत निघाले पात्रांमधून त्याच्या सगळे कसे न्हावून निघाले त्या पात्रात शोधत त्याचे वाचणारे त्यांने मजूर लिहले आणि असे निरागस लिहले विसरलेल्या सावल्या लिहल्या कवितेत आवाज लिहला रूढी वगरे साऱ्या तडीपार नेल्या कधी नव्हे त्या क्रांत्या तडीपार केल्या कोपऱ्यातल्या अंधारात वाती नेल्या बाकी आलबेलने रस्त्यावरचा कविता आसमंत केल्या.. अजिंक्य रोकडे बाकी आलबेल

मी त्याचा सारखा लिहितोय 💛

Image
मी त्याच्या सारख लिहितोय  आलबेल बिंदास होतोय  नाक्यावरचा कवी झालोय  कधी किरकिर कधी काव्यात वाहतोय  मी आयुष्यात गंडलोय जसं मद्यधुंद कवीच नृत्य बनतोय  हजारो संधीचा लाभ एक झालोय  अंधार स्वीकारत हास्य फेक होतोय  माझे शब्द कच्चे म्हणे ग्रामर गंडलय यमक हरलंय आमचं आयुष्य सरलंय भ्रमनिरास झालेल्या जगाचे वाभाडे मोजतोय मी पितोय सोबत शब्दांचा जुगार खेळतोय क्षणभंगुर आनंद शोधतोय अर्थाच्या चेतनेचा पाठलाग करतोय माझी कविता समजावी म्हणून त्या सत्याची चावी  शोधतोय माझे शब्द निषेध केलेत ते नॉर्मल करतोय अनुरूप असं काही नाही त्या अनुरूपतेच्या विरूद्ध बंड करतोय समाजाच्या रूढी आणि समज त्या मधील अंतर मोजतोय मी बहिष्कृत, चुकीचे आणि हरवलेल्यांना आलिंगण देतोय ज्यांनी आयुष्याला आवाहन दिलंय त्यांना आवाज देतोय मी प्रेमाबद्दल लिहितोय सुंदर जे आहे ते हवंय आणि दुःखद जे आहे ते पण शोधतोय हिरमुसली हृदये आणि राख झालेली स्वप्ने सावडतोय आणि प्रेमाकडे वळतोय मी सांसारिक देखाव्याकडे सुंदरतेच्या नजरेने क्वचित पाहतोय  गलिच्छ बारमध्ये स्वतःला शोधतोय एकांतीत खोलीत हजार पुस्तकं होतोय मी बिंदास होतोय किमान आलबेल होतोय किं