Skip to main content

Posts

तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो 🩶

उन्माद संपून जाईल तेव्हा  खरे उरतील सकल जण  पण त्याविन मग काय उरेल  जमिनीत काय उगवेल  आणि कोण काय पुरेल  घरी काही,  कुणाला न बोलता येऊन दाखव  कुणाचा ना रुसवा घेऊन ये  न कुणाला दिसता फिरून दाखव  एक दिवस कुणाची शपथ न घेता ये  ये असाच कधीतरी रिकामे रिकामे सागर भर  टेबलाचे वेगळे वेगळे परिप्रेक्ष दाखव  दाखव माणसाची उत्क्रांती कशी झाली  किती मिथकं आणि किती गोष्टी लयास गेल्या  उरले सुरले कसे सावरले  आवरले आणि आवरून कसे माजले सारे  एकजात कसे  वातावरणीय ढोबळ मनाने अंदाज बांध  महामारीवर रडलास तसं युद्धावर रडून दाखव  फोड खापर असंख्य गोष्टींवर जगावर  नाहीतर नाही तर, तारे आहेत लुकलूकतात  त्यांची उत्पत्ती बोल  ठिपका आहोत आपण असे मार एक एक  झोपी जाऊन पुन्हा ये ग्लिच बनून मित्रा  तुला कोड्स मध्ये शोधेन म्हणतो.....

माणसाने गझल ऐकली पाहिजे 🌼

माणसाने दुःखात गझल ऐकली पाहिजे दुःखात कवाली आणि सुखात बॉलिवूड गाणी ऐकली पाहिजेत पहाटे अभंग मदमस्त रॅप ऐकूनच माज केला पाहिजे पाहिजे क्लासिकल पण क्वचित  पंगतीत उठ बस असायला नास्तिक असावं लॉजिकने आस्थिक असावं सोयीने  मजबूर असावं सगळ्या दिशेकडून वळून पाहताना डोळे समोर असावे  डोळे कशाने थकलेत हे समजू नये पुढच्याला समज गैरसमज असावे  पुढचा कॉन्फयुज्ड करून सोडावा मोडावा अहंकार एका एकाएकाचा आपला स्वतःचा कमीपणा करून घेऊन पापं मोजता मोजता  बोटं कमी करावी पुण्य सावली सारखं जवळ असून लंब असावं अंदाज बांधू नये कुणी कुणी आकलन तर करूच नये केलेले अंदाज चुकावे आपल्या आपल्या मध्ये एक एक वयक्तिक फसावे माणूस म्हणून वागावे हे आपणच उगा बोलावे ठेचकाळलेली पावलं असावी उठाव्या पाऊलखुणा सगळीभर आसमंतात विरोधाला विरोधाभासाने उत्तर द्यावी अंगलट गोष्टी विसर्जित करावी मित्रांचे चांगले सल्ले घ्यावे  कपडे धुतात तसे करावे ते करावे साबण राहावा भांड्यानावर धुतल्यावर  तशी सल राहावी मनाच्या पटलावर  आणि जेव्हा काहीच काही नसेल तेव्हा  निर्विकार आठवला पाहिजेल  विश्वाचा...

जुलै संपता संपत नाही 🌼

जुलै संपता संपत नाही  असं काय आहे ह्या मध्ये  अचानक वेळ सरत जातेय परवानगी घेतल्याविना  जुलै चिवट आहे आहे दलदली सारखा असा भासतो कि सुख उपवासाला आणि दुःख सणाला जुलै असलं काय काळ आपल्या सोबत खेळ खेळत असतो कॅलेंडर फासे टाकत असतो जुलै अडकून राहिल्या सारखा विचार करायला लावतो जुलै असं काय होतं न्हवतं हिशोब करायला लावतो जुलै कुठे गेलंय हे सारं  नको असावा महिना हा  अडकून राहण्याचा  अस्तित्वाच्या शोधाचा सगळ्यात स्लो असलेला जुलै पळता पळत नाही जुलै संपता संपत नाही

आणि जिंकलो 🤍

चौदा वर्षाचा मुलाने सिक्सर शतक मारणं  आपण चषक जिंकणं  आपण किती रन्स झाले  किती ऑऊट झाले  किती गेले आणि किती बदला घेतला  आणि जिंकलो  आपण किती इनिमी किल्ल केले  आपण किती चिकन डिनर केले  आपण किती गोल्ड डायमंड प्लॅटिनम झालो  आणि जिंकलो  आपण किती कुणाची मारली  कुणासोबत कुणाची किती जिरवली  कुणाला किती लायकी दाखवली  आणि जिंकलो  आपण किती पैसा कमावला  आपण किती भारी नोकरी केली  किती सुंदर बायको केली  कसा संसार केला  आणि जिंकलो  आपण किती सर्विस केली  किती अनुभव आहे  किती पैसे उकळले  किती कुणासाठी काय केलं  आणि जिंकलो  आपण किती माज केला  आपण किती उन्माद केला  आपण कुणालाच भिलो नाय  मी अजिबात घाबरत नाय  आणि जिंकलो  इतकं सोपं सोपं हे सगळं नाय लिहलेलं समजेल इतकं पण सोपं नाय  कोण मला काय बोलेल इतकं पण सोपं नाय  कुणाच्या भावना दुखावतील इतकं पण सोपं नाय  दुखावल्या तरी काय बोलू शकत नाय  लिहीत इतकं पण सोपं नाय  बाकिआलबेल

म्हातारा चांगला होता..... 🌱

घरा सुधरू लागली हात, वाडीतली पोरा मोठी व्हाया लागलीत हात, पैसा आलाय, म्हातारा गेल्यापासून एकटीच मरतेय ह्या मापाच्या घरात, मला तरी कशाला हवाय मरायला चांगला घर, पोरा बाला असती तर एकांदी बारीस वाटला असता, काय रुबाब होता नय, सावकार आमचा म्हातारा मेला दारू नी वाट लावलंन नाहीतर काय जमीन म्हणून होती, नवीन आलली घरी तेव्हा म्हतारा अडल्या नडल्या माणसाला उभा राहायचा, आता कोण बोलील काय?मला पण नको झालाय हा जिना, म्हाताऱ्याची रया गेली ती जमीन लुबाडलिन तेवा, नाहीतर म्हातारा माझा चांगला होता,शेती वर सगला संसार उभा केलेलंन, पण जमीनच परकी झाली आणि म्हातारा येडाच झाला, दारू काय आणि मला शिव्या काय,आंब म्हणून काय यायचं, मला पिऊन आला कि बोलायचा आपली कलमा आणि तू एकसारखी मेली वांझोटी झालीयत, मी आपली गप गार देव्हाऱ्यात जाऊन टिपा गालित बसायची, कुणाला सांगणार, भयनी झाल्या तरी त्यांना त्यांचा याप काय कमी होता, मेली ही पुरुष जातच घोड्यान काढलली, किती पण जीव आटवा मेली बाई माणसाला ऐकून दाखवतील, मेली गुलाम झाली नाय ती कधी, तसा होता मेला चांगला पैसं कमी झाल्यावर डालगी बनवू लागलेला, हाताला कला होती, असा उपा...

किर्रर्र 🍃

   लाकडी आरामाखुर्चीवर जेव्हा रघु बसला तेव्हा 'किर्रर्र' असा आवाज आला, विचारांची साखळी काही वेळा साठी स्तब्ध झाली आणि पुन्हा स्वतःला कमफॉर्टेबल करून घेतल्यास ती साखळी नव्या विचारांना वाट करून देऊ लागली... रघु नुकताच कामावरून आलेला, समाधानी वाटाव इतकं समाधान तर होतच त्याचाकडे पण मन सैरावैरा, कानात वारा गेलेल्या वासारा सारखं वेडंवाकडं पळत होतं, ह्याच कारण अचानक गार वारं सुटलेलं, हवेत गारवा आलेला आणि त्यासोबत पालापाचोळा उडत खिडक्यानमधून आतमध्ये येत होता, एरवी तो कचराच जणू पण आज ते काहीतरी भासवत होतं, रघुने जेव्हा पहिल्यांदा गाडी घेतलेली तेव्हा लीलासोबत रघु बाईकने फिरायला गेलेला, चहाच्या टपरीवर थांबले असताना असंच काहीसं वातावरण तयार झालेलं, तिचे केस तेव्हा हवेत एक फ्रेम बनवून आकाशासोबत एक सुंदर कलाकृती बनवू पाहत होते, चहाच्या वाफा तिच्या चसम्यावर येऊ पाहत होत्या आणि ती चष्मा व्यवस्थित करू पाहत होती, ओढणी सांभाळत होती अशी तिची अल्लड गडबड झालेली, रघुच्या मनात एक सुंदर आठवन, आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टींच्या यादीत त्यांनी ठेवलेली ती आठवण आज मनात ह्या वातावरणाने रेंगा...

सुना है जंगलों का भी कोई दस्तूर होता है🌱

हैदराबाद मधील कांचा फॉरेस्ट (गाचीबोवली) रडत आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी रडत आहे.या दिवसात, या इतर भूतकाळातल्या अप्रासंगिक कोलाहलतून जर वायरल झालेली कांचा फॉरेस्ट मध्ये वृक्षतोड, जंगलतोड करतानाची विडियो पाहिली असेल,  त्यात पक्षी रडत आहेत , जसा एखाद्‌या मनुष्याचा निवारा गेल्यावर माणूस रडतो तसाच कोणताही संवेदनशील माणूस की परिस्थिती पाहून निराश होईल. हैद्राबाद युनिवर्सिटीची ४०० एकर जागा तेलंगणा सरकार लिलावात काढण्यास उत्सुक आहे, कशासाठी तर आय.टी. पार्क बनविण्याचा त्यांचा मानस आहे. ४०० एकर जागा ही काही छोटी मोठी गोष्ट नाही. दक्षिण भारतातल्या लोकांकडे आपण सरसकट सुशिक्षित राज्यं ,लोकं म्हणून पाहतो, पण ही काही तशी लक्षणं दिसून येत नाहीत.युनिव्हर्सिटीचे शिक्षक, कर्मचारी, विदयार्थी पर्यावरणवादी बरेच दिवस आंदोलन करीत आहेत पण त्यांच्यावर देखील धोपटशाही चालू आहे. बुलडोजर्स आपले काम चालूच ठेवत आहेत . तेलंगणा सरकारचं म्हणणं असे आहे कि या वनात वाघ,हरीण,इ प्राणी अस्तित्वात नाही आहेत पण हैदराबाद यूनिवर्सिटीच्या एका संशोधनाच्यामते तिथे ७००हुन अधिक फूल झाडांच्या प्रजाती,  सस्तन प्राण्...

वस्तूंचा मोह सुटावा 🫴🌱

संघर्ष कुणाला नाही चुकला म्हणा, हे असं उदास आणि निराश वाटणं साहजिकच असतंय, मी बरेच जणांना पाहिलं आहे आव आणताना कि पहा किती पॉसिटीव्ह वगरे आहे पण सुखी तो असतो किंवा दिसतो, जो व्यक्त होत नाही.... मी नेहमी पाहत असतो पेजेस फेसबुक वर ज्यावर वेगळी वेगळी पेंटिंग्स वगरे असतात vincent van gogh सोबत ओळख झाली रमायला होतं त्याचा चित्रात, व्हिन्सेंट व्हॅन गॉग हा खरंच सध्या माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक झाला आहे, मी आता आता त्याचासोबत कनेक्ट होऊ लागलो, त्याची दुनिया रंजक आहे, जादुई आहे जे जे आपल्याला प्रश्न भेडसावत असतात त्यांना तो उत्तर आहे.... नैराश्य, चिंता आणि हजारो लफडी आणि स्वतःबद्दलची कीव आपण ज्या ज्या सोबत झुंजत आलो, भांडत आलो, निस्तरत आलो पण हे काही रडल्यागत नाही सांगत कॉमन आहे आणि सगळ्यांना मान्यच असतं थोड्याअधिक प्रमाणात ते आपलं 🫴 so called दुःख, पण काहीतरी सकारात्मक नसेल निष्कर्ष तर त्या कलेला आणि कलेच्या माऱ्याला काय अर्थ......  व्हॅन गॉगप्रमाणेच, मलाही नेहमीच रात्रीच आकर्षण राहिलं आहे. त्याच्यासाठी रात्र प्यारी होती आणि दिवसभराच्या कामानंतर त्याचा त्याचा एक स्पेस होता...

धडा आयुष्यभराचा 🍂

मी कसा शिक्षक झालो हा मलाच पडणारा प्रश्न नेहमी असतो, लोकांना पण तोच प्रश्न पडतो, बरेच टोमणे पण ऐकतो मी लोकांचे माझा पास्ट फार struggle चा राहिला आहे पण त्याच रडगाणं राहिलं बाजूला मला सांगायचा पण नाही, मी जेव्हा शिक्षक म्हणून गेलो थेट दहावीच्या वर्गात पाठवलं मला काहीच पूर्वतयारी नाही मी कैलास सत्यार्थी ह्यांचा धडा lets march म्हणून शिकवायला घेतला, मला कल्पना होती हें काय आहे आणि काय होतं, कैलास सत्यार्थी कोण मलाला कोण मला माहित होते, त्यामुळे जबरदस्त lecture झालं आणि एक वेगळंच कॉन्फिडन्स आला माझ्यात नंतर वर्ष निघून गेलं एक batch चांगल्या मार्क्सने बाहेर पडली आणि आज पून्हा तोच धडा शिकवताना शाळेच्या बाहेरच्या आवारात काही मजूर पाईपलाईन जलजीवन का कश्या साठी खड्डे मारत होते मी शिकवत होतो नेमका हाच धडा ( कैलास ह्यांना नोबेल मिळालं तेव्हा नॉर्वे मधील भाषण ) आणि बाहेर एक त्या मजुरांची मुलगी एका स्टीलच्या डब्यात तांदूळ उकडून केलेली पेज पीत होती, शाळेसमोरून जाणारी लोकं नेहमी चालू असतात तर ती मुलगी माणसं अनोळखी दिसली कि झाडामागे लपून ती पेज प्यायची ( ह्याची कारण नेमकी ह्याच धड्यात होती...

गॅलॅक्सि 🌼

प्राजक्ताचा सडा पाहताना  एक वेगळी गॅलॅक्सि दिसतेय  रचना अशी कि कोड्स असावे जणू  सुवास असा कि आठवणींचा ग्लीच असावा  देजावू आठवणींचा असा कि  वेगळीच फुलं असावी तिथे  गोंडा जास्वंद किंवा धतुराच असावा  वेल असावा काकडीचं फुल असावं  कोड्स असावे नसावे स्वप्नात  पण प्राजक्ताचा सडाच दिसावा असा  कि ऐपत इतकी असावी कि पेव्हर ब्लॉक असावे  अंगणात  घेरा नसावा रोपाला मस्त बांध असाव काम  पडावी अशी फुलं कि आठवणी याव्या उजळून  पाहिलेल्या स्वप्नाना शिव्या देता याव्यात  जेवढी फुलं सड्यात आहेत  पण सडा सुंदरच वाटावा असा कि  पोकळी निस्तारता यावी  त्यातच गॅलॅक्सि दिसावी  जिवंतपणी 🌼 अजिंक्य रोकडे  #बाकीआलबेल 

रातराणीच्या झाडाखाली 🌼

झोप अशी हवी  रातराणीच्या झाडाखाली  इंद्रिय अशी हवी कि तृप्त होता होता  पुन्हा जागेत जागेवर यावी  उठल्यावर रंग असे हवे कि सूर्याला लाज वाटावी  लाज अशी हवी कि समाज झेलता यावा  समाज असा हवा कि लाज वाटू नये  लोकं अशी हवी कि समाज बोलता यावा  मुद्दे असे हवे कि तडीस गेले पाहिजेत  तडीला जाणारे विषय असे हवे कि मुद्द्याचे हवे  राग असा हवा कि सगळे एक आले हवे  एक एकता अशी हवी कि हातात हात हवे  भांडण करायला मजबूत हात हवे  हात असे असावे कि दोन हात करताना भीती वाटू नये  भीती अशी हवी कि हात पूढे जाऊ नये  पुढारपण असा हवा कि निस्तरता आला पाहिजे  निस्तरणं असं पाहिजे कि तडीस जावे सारे  मूर्खपणा असलेला बरा आपल्या आपल्या कोषात  कोष असा हवा कि एकटा डुकता बरं वाटावं  एकटेपणा इतका असावा कि  बाकी सारं आलबेल वाटावं  झोप अशी असावी  रातराणीच्या झाडाखाली 🌼 देवा रोकडे  #बाकीआलबेल

माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते 💰

स्टॅन्डवर वडा खाताना  आजी येते रोजची फुकटी  तेव्हा वाटतं  माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते  झोपलेला बेवडा जेव्हा  किरकोळ फालतू कारणं सांगून  औषध मागतो तेव्हा वाटतं  माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते  मित्राचा हवा सिलेंडर संपतो  पोटाचा गोळा गोड गोड खाऊन गुरगुरतो  तेव्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते  ह्या सणासुदीत जेव्हा फटाके उंच, उंच मुर्त्या आणि उंच रंगांची बेरंग दुनिया बघतो तेव्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते समाज समाजाची सेवा करून देखावा समाजात करतो  पण असलेले प्रश्न नसल्यागत भासवतो  तेव्हा समाजाला सामोरं जाताना  समाजसेवा करताना वाटतं  माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते नसलेल्या वावरात वावर करताना  समाजात नसलेल्या सृजनात सुटा बुटात गेलेले  मातीतून काँक्रिट झालेले मित्र बघताना वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते पैसा जमवून वापरून उडवून संपवून पुन्हा वाटतं माझ्याकडे थोडेफार पैसे हवे होते🌼

आता सोड ना कविता 🌼

आता सोड ना कविता कुठे ऐकतो  शांत आहे सारं उगा कसली वाट बघतो  मी बोललो कि तुम्ही वाह वाह करताल  झाटाची फाटा मलाच समजणार नाही तुम्ही उगाच फुगताल  हे असं रसिक वगरे  असं कवी वगरे  काही काही नसतं  असं गोड गोड श्रोते वगरे काही नसतं  असले माझ्यागत येडझवे वक्ते वगरे क्वचितच चुत्ये  काहीच काही नसतं  लक्ष्मी बोल  धंदा बोल  तराजू घे आणि किती पाप करू शकतोस ते एकदा तोल  यश लोळण घालेल येड्यागत करू नकोस  असलं नाती गोती आणि असली माणसं  सोन्याची जेजुरी वाटते पिवळी जेव्हा कावीळ आपली  कावीळ झाली कि उतारा हवा  उताऱ्याला सांगाव, तू प्रश्न कर  आलो  ना कामाला  बोल स्वप्न पाहू  असे ना तसे आलबेल होऊ  #बाकीआलबेल

प्ल्यूटो🌼

murphy's law तसा घाणेरडा प्रकार, वैज्ञानिकदृष्ट्या तो काही सिद्ध वगरे झालेला नाहीय पण तो काम करतो खतरनाक, तसं काही गोष्टी सिद्ध व्हाव्याच लागतात असं देखील काही नाही, काही गोष्टी दाबून ठेवाव्या लागतात अंतरमनात, असे जड शब्द लेख तरी भारी बनवतात नशीब कोवळ्या वयात काही पुस्तकं अशी वाचून ठेवली आहेत, त्या शिवाय भूमिकेला भक्कमपणा येत नाही, लोकांना आपण दूरचे वाटू लागतो जेव्हा सगळं तरल दिसू लागतं मग कोणत्या अपेक्षित गोष्टी न का होईना सगळं ठीकच आहे हा अट्टाहास हवा वाटतो, ह्या साऱ्या कोलाहलात आपण आपले विचार आपल्यासोबत होणाऱ्या घटना सगळ्या चिंधी म्हणून जग पाहत असेल तेव्हाच आपण घडत असलेल्या पेक्षा वाईट चिंतून बुध्दासारखे हसत असतो किंवा हळहळत असतो, एकादी गोष्ट वाईट होतच गेली तर ती वाईटच होते असं काही ऐकून पाहून वाचून अजून वाईट होण्याची शाश्वती मिळते त्यावेळेला मोटिवेशन म्हणून राशीभविष्य वाचताना लाभ होईल वाचून अजून हळहळ होते, लाभ होतात ते कोणत्या बाबतीत किती बाबतीत आणि कोणत्या परिप्रेक्षात, कोण काही सहज बोलून जातंय तेव्हा त्याचे शब्द, वागणं लाभामध्ये धरून ठेवायचे असतात का? दिवस चांगल्य...

प्रवास आपला कधी नं जावा संपून...✨🏔️

विरान पडलेल्या वाळवंटी प्रदेशात बर्फ अचानक पडावा इगलू मात्र आपला सुका सुका असावा त्यात बॅगेतून आणलेला कांदा मिरची टोमॅटो सारं काढून दोन चार पाईनची फाटी आणून आग लावावी दगडाने दगडावर रगडून तुझ्या माझ्या थरथरत्या हाताला मग आगीची उब त्या आगीवर भगूणं छोटंसं ठेवून करावे पदार्थ आपण हवे नको आपल्याला दोघांनी मिळून भूक मिटवावी घासावर घास छोटे ठेऊन पसरावी पश्मिना चादर तलम झोपावं दोघांनी कुशीत कुशी घालून स्पर्शावर स्पर्श करावा हट्टी बनून झोपेत जागेपणीची स्वप्न पुरी करावी मग पाहिलेली स्वप्न पूर्णत्वास न्यावी मग स्वप्नात स्वप्न बनून राहावं डोळ्यांवर डोळे ठेवावे काजळाने मिटून सकाळ व्हावी चेहऱ्यासमोर एकमेकांच्या चेहरे नवीन वाटावे एकमेकांचे इगलू मधून बाहेर येऊन पुन्हा वाट शोधावी पायावर पाय ठेऊन चालावी दोघांनी  प्रवास आपला कधी नं जावा संपून... अजिंक्य रोकडे

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल.. 🌼

प्रेम करण्यायोग्य जेव्हा कोण मिळेल तेव्हा तू जाशील दूर रानात तेव्हा तिथे खूप सारी घनदाट झाडी मिळेल पण ओलावा शोधत असताना तुला समजेल माझे विचार किती तरल होते हातात हात घेऊन जेव्हा वाळूवर पाय रोवून तुम्ही जेव्हा प्रेम करत असाल तेव्हा समजेल माझी नजर क्षितिज भेदत होती  कॅफे मध्ये वाफालणारी थंड कॉफ़ी तुम्ही एका स्ट्राव मधून पिऊ लागाल तेव्हा माझी तहान तुझ्या लाळेपेक्षा मोठी होती हे समजेल तुम्ही एकादी निर्जन जागा पहाल आडवे इन्फ्रंट होत जाल तेव्हा समजेल माझ्या मनात बस स्पर्शाच्या भावना होत्या तुम्ही उभे राहाल बोहल्यावर तेव्हा संगीत असं विरश्री मध्ये असेल पण तूला माझी आठवन येईल आणि समजेल मी कसा सुमधुर होतो.. #बाकीआलबेल अजिंक्य रोकडे

बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल 🌼

जगाविषयीची कटुता विसरून आपण प्रेम करत सुटलो पाहिजेल ह्या साऱ्या सणासुदीत आपण तारखा विसरत राहता आलं पाहिजेल मोजलेले पैसे आलेल्यातून वजा झाल्यावर हसू कायम राहीलं पाहिजेल ह्या साऱ्या वेळेत न होणाऱ्या गोष्टी आपण सहन करत ओठांवर हसू कायम ठेवता आलं पाहीजे काहीही असो आनंदी राहिलं पाहिजेल म्हणणारा कसा चुतिया आहे हे त्याने अंतर्मनाला विचारलं पाहिजेल उगा का कोण बुद्धत्वाला जातो असं वागता आलं पाहिजे कि बुध्दालाही प्रश्न पडला पाहिजेल  कालातीत प्रवास करता आला पाहिजेल अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

महत्वाच काहीतरी

यात काहीही शंका नाही कि शिक्षण माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आपल्या संविधानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद कलम २१(A) अंतर्गत करण्यात आली आहे. तर अस आहे कि ७०% लोकसंख्या, जर खाजगीकरणा झाले तर हा खर्च उचलू शकणार नाहीत . गरीब व कष्टकरी मूले जर काही प्रमाणात शिक्षण घेत असतील तर मोफत शिक्षणाच्या धोरणामुळे, मूलभूत हक्काच्या मूलभूतपणाचा गाभा प्रतिष्ठा राखणे हा आहे, जर शिक्षणाचे खाजगीकरण झाले तर एक ठराविक वर्गच त्याचा लाभ घेऊ शकतो आणि इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. शिक्षणाकडे जर व्यवसाय म्हणून पाहिलं गेलं तर शिक्षण आणि ज्ञान देणे हे मुद्दे दुय्यम होऊन फक्त आर्थिक प्राप्तीकडे कल वाढेल. मागच्या वर्षी १ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याची तयारी प्रशासनाने दाखवली होती तेव्हा मी लेख लिहलेला होता आणि आता देखील 'समूह शाळा' धोरण राबवण्याचा हट्ट प्रशासनाने केला आहे, या धोरणाला सगळीकडून विरोध चालू असताना देखील हा सर्वे व धोरण पुढे रेटले जात आहे. गावपाड्यात शाळा जवळ आहे म्हणून येणारी कितीतरी मुलं आहेत किंवा पोषण आहार मिळतो म्हणून येणारी मुलं आहेत आणि ही ...

चाफा कधीच कोमेजू नये 🌼

चाफा कधीच कोमेजू नये हा माझा हट्ट खरा त्याचा वास घेत राहायला हात वरती करू नये  छातीपाशी खिशात ठेऊन घेता यावा निरंतर खरं तर केसं पण पिकू नये कुणाची नां कुणाला ययातिची फिलिंग यावी नां कुणी यतीची वाट पाहावी सगळं कसं चालू राहावं कष्टाविना चालू रहावं दुःखाविना  असावं सगळं कसं आलबेल चाफा सुकू नये कधी सुवास कोमेजू नये कधी कधी वाटतं त्यांना तोडू पण नये त्यांना पण जगू द्यावं असंच सुवासिक नाकं न्ह्यावी फुलाजवळ होऊ नं द्यावा मृत्यू देव,माणूस कुणाच्या चरणी नको कुणाचा आवडता नको होऊ द्यावं त्याला चाफ्याची जिंदगी त्यालाच माहित सुंदरतेचे भोग सगळे आवडतीचे रोग सगळे मग म्हणाल चाफा बोलेना चाफा चालेना कसा चालेल कसा बोलेल चुकून विचार येऊ नये चाफा कधीच कोमेजू नये अजिंक्य रोकडे #बाकीआलबेल 

मी मेसेज करत जातो 🤍✨

काल स्वप्नात तिला काल्पनिक hii केला मी, बोललो काहीसं, सांगितलं भूक लागतेय फार आणि खूप सारं खाऊन पुन्हा भूक लागतेय नाही खाल्लं कि विकनेस येतो विचाराने, तू नाय नाय करत तरी माझा विचार करत असशील का तुला भूक लागत असेल का कि जेवण झाला का हा काल्पनिक मेसेज माझा जातोय तुला मग मी गारव्या मध्ये गरम शोधत बुरमूस टोचणारी घेऊन हवं नको असलेलं ऍडजस्ट करत खाज उताणा झोपून तुझ्या भावना चेपत जातोय निरामय आत्म्याच्या भाराखाली हलक्या शरीराने तेव्हा तुला मेसेज जातोय झोपलीस का, तू झोपत अशील का विचाराने झोपेत साप वगरे येतात मी लय घाण घाण स्वप्न बघतोय लोकांना मारतोय, apocalypse पाहतोय पेट्रोल वगरेचा जागतिक पाऊस पडत आहे मी हतबल सगळं पाहून पळत आहे लोकं पळत आहेत मी घाबरून जातोय खुश होतोय लोकांना पळताना आणि अचानक माझा तोल जाऊन पडतोय आणि उठतोय झोपेतून तेव्हा माझी  ऍड्रेणिल रश जो सत्यात नाही तो स्वप्नांत पूर्ण झाला म्हणून उठून घाबरलेला खुश मी, मी घाण स्वप्न असंच पाहत गेलो, गिल्टी झालो, चिवळत बसलो गु घाण, तुला असं झालंय का कधी, असं निरपेक्ष वेडेपणाची स्वप्न तुला अधून मधून पडत असतील का तेव्हा मी मेसेज क...